Video Shivsainik Celebration Mumbai: आवाज कुणाचा, शिवसेनेचा; शिवसैनिकांचा शिवसेना भवनासमोर एकच जल्लोष
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : दसऱ्याच्या मुहुर्तावर दादरमधील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (Shivaji Park Dussehra Gathering) घेण्याची शिवसेनेची परंपरा आज मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे (Dussehra Gathering Court Verdict) कायम राखली गेली. यंदाच्या दसऱ्याला शिवतीर्थावर दसरा मेळावा (Dussehra Gathering at Shivtirtha) घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी शिंदे गट आणि शिवसेना या दोघांकडूनही मुंबई पालिकेकडे अर्ज करण्यात आला होता. हा वाद न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने आज शिवसेनेच्या बाजूने निकाल देत पक्षाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. न्यायालयाचा निकाल येताच शिवसेना भवनासमोर जमत शिवसैनिकांनी एकच जल्लोष (Shiv Sainik Jubilation Mumbai) केला. यावेळी बॅंडच्या ठोक्यावर ठेका धरत शिवसैनिकांनी नाचून जल्लोष केला. यावेळी शिवसैनिकांचा आनंद गगनात सामावत नव्हता. अनेक महिला आणि पुरूष शिवसैनिकांनी हातात भगवा घेत शिवसेनेच्या समर्थनार्थ घोषणाबाजीसुद्धा केली. बाळासाहेबांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा न्यायालयाच्या निकालाने (Shiv Sena Victory in Court) कायम राखली गेली, याचे समाधान शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर झळकत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST