Manipur protests : मणिपूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून निदर्शने....
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर सामूहिक बलात्कार करून त्यांची नग्न धिंड काढून त्यांना मारण्यात आले. त्याच्याविरुद्ध आज पुण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आक्रमक महिला शिवसैनिकांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मणिपूर येथील मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. मणिपूर सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी म्हणाल्या की, मणिपूरमध्ये जी घटना घडली आहे. ती अत्यंत निंदनीय आहे. न्यायालयाने सूचना केल्यावर देशाच्या पंतप्रधानांनी याकडे लक्ष दिले. गेली 77 दिवस झाले मणिपूर जळत आहे. पण तेथील भाजप सरकार आणि केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. देशात महिला असुरक्षित असून भाजपच्या महिला यावर काहीच बोलत नाहीत. आमची मागणी आहे की, देशाचे पंतप्रधान तसेच मणिपूरचे मुख्यमंत्री यांनी याबाबत राजीनामे द्यावे.