Sanjay Shirsat On Congress : काही दिवसांतच काँग्रेस फुटणार; शिवसेना आमदाराचा मोठा गौप्यस्फोट - Sanjay Shirsat
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/06-07-2023/640-480-18932893-thumbnail-16x9-sanjay.jpg)
मुंबई : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अनेक काँग्रेस आमदारांना पक्ष सोडायचा आहे. मी ऐकले आहे की, 16-17 आमदार काँग्रेस सोडू इच्छितात. ते लवकरच निर्णय घेतील, त्यानंतर काँग्रेसही फुटेल असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. राज्यात एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील हे 'मी' स्पष्ट करतो. देवेंद्र फडणवीस यांनीही पुढील निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे, अशी माहिती देखील आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे. राज्याच्या राजकारणात भूकंप आला आसतानाच भविष्यात काँग्रेसमध्येही फूट पडेल, असा दावा आमदार संजय शिरसाटांनी केल्यामुळे राज्यात चर्चेला उधान आले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा भूकंप होणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ नेत्यांचा नुकताच मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यामुळे शिवसेना आमदार नाराज झाले आहेत, अशा चर्चा सुरु होत्या. मात्र आमच्यात कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्टीकरणही शिरसाट यांनी दिले आहे.