शिवतीर्थावर शिवसेनेचीच तोफ धडाडणार; उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष

By

Published : Sep 23, 2022, 9:05 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

thumbnail
मुंबई ः दसऱ्याच्या मुहुर्तावर दादरमधील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (Shivaji Park Dussehra Gathering) घेण्याची शिवसेनेची परंपरा आज मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे (Dussehra Gathering Court Verdict) कायम राखली गेली. शिवसेना भवनावर जमत शिवसैनिकांनी आज एकच जल्लोष केला. कोर्टाच्या या निकालामुळे शिवसेनेची दसरा मेळावा ठरलेल्याच मैदानावर घेण्याची परंपरा कायम राहणार आहे. शिवतीर्थ, ठाकरे परिवार आणि दसरा मेळावा यांचे घट्ट नाते आहे. यासाठी यंदा न्यायालयीन लढा लढावा लागला. यात शिंदे गटाला पराभूत करत शिवसेनेने कोर्टातून विजय प्राप्त केला. प्रबोधनकार ठाकरे यांच्या काळापासून माहीम मैदान शिवतीर्थ म्हणून ओळखल्या गेले. बाळासाहेबांनंतर आता उद्धव ठाकरे यांचे भाषण शिवसैनिकांनी ऐकले; मात्र यंदाच्या शिवसेना मेळाव्याला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Shivtirtha speech) नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर बोलणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.