Pratavarao Jadhav On Sanjay Raut: खा. प्रतापराव जाधव यांची जीभ घसरली, संजय राऊतांवर केली हीन शब्दात टीका - Shinde group MP Pratavarao Jadhav

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 22, 2023, 4:37 PM IST

बुलडाणा: शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. अत्यंत हीन शब्दांमध्ये खा. जाधव यांनी ही टीका केली आहे. संजय राऊत हे 'सकाळचा भोंगा' म्हणून प्रसिद्ध आहेत. मीडियासमोर वात्रटपणाने बोलतात. संजय राऊत कोण आहेत? सकाळी एक बोलतो आणि सायंकाळी समर्थन करतो, असा निशाणा जाधव यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर साधला. महाविकास आघाडीतील सगळी मंडळी ओबीसी विरोधी मंडळी आहेत. त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वारंवार निवडणुका घेण्याची मागणी करतात. त्यांनी पाहिले जाहीर करावे की आम्ही ओबीसी विरोधात आहोत, असे आव्हान प्रतापराव जाधव यांनी दिले. चुकीचे व्यवहार झालेत त्या ठिकाणी ईडी धाडी टाकत असते. ज्या ठिकाणी धाडी पडल्या तर लोक कोणाच्या तरी जवळचे असू शकतात, असाही टोला खासदार प्रतावराव जाधव यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. अत्यंत हीन भाषेमध्ये जाधव यांनी टीका केल्याने यावर राऊत काय प्रतिक्रिया देतात याची उत्सुकता आहे.
 

हेही वाचा:

  1. MAT on Transfers: शिंदे-फडणवीस सरकारला मोठी चपराक, ताशेरे ओढत सर्व बदल्यांचे आदेश मॅटकडून रद्द 
  2. Sanjay Raut News: या कर्माची फळ त्यांना भोगावे लागतील... ठाकरे कुटुंबाची सुरक्षा कमी केल्याने संजय राऊत आक्रमक
  3. Udayanaraje VS Shivendraraje: भूमिपूजन राड्यानंतर उदयनराजेंसह ५० जणांवर गुन्हा दाखल; दोन्ही राजेंनी कराडमध्ये घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.