मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं स्टेअरिंग धनंजय मुंडेंच्या हाती - धनंजय मुंडे
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 5, 2023, 9:59 PM IST
बीड Shashan Aaplya Dari : शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बीडमध्ये आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी चक्क कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी चालवली आहे. त्यानंतर शिंदे यांनी गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आज बीडमधील परळीत आयोजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आम्ही नुसते बोलत नाही, काम करुन दाखवतो. पण आज काही लोक पत्रकार परिषद घेऊन शासन आपल्या दारी हा सरकारचा बोगस कार्यक्रम असल्याचं सांगतात. ते योग्य नाही. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात धनंजय मुंडे यांचं कौतुक केलं. हे सर्व काम करत असताना धनंजय माझ्या जवळ असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच ते फडणवीसांच्या देखील जवळ असल्यामुळं काळजी करण्याची गरज नसल्याचं अजित पवार म्हणाले.