Sharad Pawar meet Eknath Khadse : शरद पवारांनी घेतली एकनाथ खडसेंची बॉम्बे रुग्णालयात भेट - हृदयविकाराचा झटका
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 6, 2023, 12:28 PM IST
मुंबई Sharad Pawar meet Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विद्यमान आमदार एकनाथ खडसे यांना रविवारी (5 नोव्हेंबर) रात्री हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तातडीनं जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढील उपचारासाठी खडसे यांना रात्री उशिरा मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. आज (6 नोव्हेंबर) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकनाथ खडसे यांच्या भेटीला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. शरद पवार यांनी एकनाथ खडसेंची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. तसंच यावेळी मंदाकीनी खडसे आणि एकनाथ खडसे यांचे फॅमिली डॉक्टर अभिषेक ठाकुर यांनी शरद पवार यांना खडसेंच्या स्वास्थ्याविषयी माहिती दिली. दरम्यान, रात्री एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं त्यांच्यासाठी एअर अँब्युलन्सची व्यवस्था केल्याचं सांगण्यात येतंय.