Sharad Pawar On Maratha Reservation : आंदोलकांवर बळाचा वापर करण्याची गरज नव्हती, पवारांचं सरकारवर टीकास्त्र - राष्ट्रवादीचे अधक्ष्य शरद पवार
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 2, 2023, 9:30 PM IST
जालना Sharad Pawar On Maratha Reservation : जालन्यातील अमानुष घटनेला राज्याचं गृहखातं जबाबदार आहे असं, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज अंबड तालुक्यातील अंतरवली गावातील आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य करत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलंय. पोलिसांनी बळाचा वापर करण्याची गरज नव्हती. आंदोलन शांततेत सुरू होतं. मात्र, पोलिसांना मुंबईतून फोन आल्यानंतर आंदोलन चिघळ्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी महिला, मुंल तसंच वृद्धांवर देखील लाठीहल्ला केल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आंदोलन शांततेत सुरू असताना प्रशासनाशी सकारात्मक चर्चा सुरू होती. मात्र, काल अचानक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा पोलिसांनी लाठीहल्ला केल्याचं स्थानिकांनी मला सांगितलं. या घटनेची चौकशी करायला हवी, लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील शरद पवार यांनी केलीय.