Sharad Pawar On Diwali : पवारांची दिवाळी! माणसांच्या आयुष्यामध्ये चढ-उतार येतात,संकटांना तोंड द्यावं लागतं - शरद पवार, पाहा व्हिडिओ - Pune News

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2023, 3:52 PM IST

पुणे (बारामती) Sharad Pawar On Diwali : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) बारामतीतील गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी आहेत. यावेळी त्यांनी दिवाळीनिमित्त (Diwali) महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पवार यांनी शुभेच्छा देताना म्हटलं की, सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये चढ-उतार येत असतात. वेळप्रसंगी त्यांना संकटांनाही तोंड द्यावं लागतं. मात्र आयुष्यातील काही दिवस असे असतात की, या सर्व संकटांचं विस्मरण करून आनंदानं कुटुंबाच्या समवेत दिवस घालवत जगावं अशी इच्छा असते. अशी इच्छा व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे दिवाळी. महाराष्ट्रासह देशात लोक आनंदाने दिवाळी साजरी करत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला हा दिवाळीचा सण त्यांच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी घेऊन येऊ देत, त्यांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होऊ देत. अशा शुभेच्छा दिवाळीनिमित्त पवारांनी (Sharad Pawar Diwali Wishes) दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.