Satara Crime News : चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल - देवदास नरळे
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 28, 2023, 3:44 PM IST
|Updated : Aug 28, 2023, 5:27 PM IST
सातारा : गुरांना चारा घेण्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून, महिलेला भर चौकात बेदम मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना माण तालुक्यात घडली आली आहे. माण तालुक्यातील पानवण या गावात चौघांनी महिलेला दांडक्यानं तसंच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तिचा विनयभंग केला आहे. त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी देवदास नरळे, पिंटू नरळे या दोघांना अटक केली आहे. तर संतोष नरळे, जनाप्पा शिंदे हे दोघे पळून गेले आहेत. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. पीडित महिला गंभीर जखमी झाली असून, तिला म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, घटनेतील फरार संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना केले आहे.