साताऱ्यात ब्रेकफेल डंपरचा थरार; एका कारसह सात दुचाकींना चिरडलं, पाहा व्हिडिओ - साताऱ्यात ब्रेकफेल डंपरचा थरार
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 21, 2023, 7:04 AM IST
सातारा Satara Accident : ब्रेकफेल झालेल्या काँक्रीट मिक्सर डंपरचा थरार साताऱ्यातील अजिंक्य कॉलनीत बुधवारी (20 डिसेंबर) दुपारी बघायला मिळाला. अचानक ब्रेकफेल झालेल्या मिक्सरच्या डंपरनं उतारानं जाऊन एका कारसह सात दुचाकींना चिरडलं. नंतर गुलमोहराच्या झाडाला धडकल्यानं हे वाहन थांबलं. मात्र, जाेरदार धडकेमुळं गुलमोहराचं झाड देखील मुळासकट उन्मळून बाजूच्या वाहनांवर पडल्यानं झाडाखाली उभ्या असणाऱ्या वाहनांचं मोठं नुकसान झालंय. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ब्रेकफेल झालेलं हे वाहन काँक्रीट मिक्सर प्लांटचं होतं. या घटनेनंतर वाहन चालकानं घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान, निष्काळजीपणानं वाहन चालवल्या प्रकरणी वाहन चालक सचिन भोसले (रा. निकमवाडी, ता. वाई) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.