Uddhav Thackeray सत्तेच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या तपास यंत्रणा बंद केल्या पाहिजे, उद्धव ठाकरेंची टीका - Sanjay Raut met party chief
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई पत्राचाळ प्रकरणी मागील तीन महिने तुरुंगात असलेले शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) अखेर जामीनावर बाहेर आले ( Sanjay Raut released from jail ) आहेत. बुधवारी त्यांचा जामीन मंजूर झाला. त्यानंतर त्यांची मोठी मिरवणूक काढण्यात आली. आज संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट ( Sanjay Raut met Uddhav Thackeray ) घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे तसेच संजय राऊत यांनी सोबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या तपास यंत्रणा बंद केल्या पाहिजेत असा मुद्दा उपस्थित केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST