Pandharpur : तब्बल अकरा लाख रुपये किमतीचा चंदन हार विठ्ठलाच्या चरणी, पाहा.. - अकरा लाख रुपये किमतीचा चंदन हार पंढरपूर
🎬 Watch Now: Feature Video
पंढरपूर : दक्षिण काशी ( South Kashi ) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सध्या कार्तिकी वारीचा उत्सव सुरू आहे. भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची ख्याती आहे. सध्या पंढरपूर मध्ये कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. देशातील महत्त्वाच्या तिर्थक्षेत्रांमध्ये पंढरपूरचे नाव घेतले जाते. त्यामुळे तिरुपतीचा बालाजी, शिर्डीचे साईबाबांना भाविकांकडून जसे दान मिळते त्याप्रमाणे पंढपूरच्या पांडुरंगा चरणी देखील मनोभावे दान केले जाते. अशात एका भाविकाने 11 लाख रुपये किंमतीचा 19 तोळे वजनाचा सोन्याचा चंदनहार विठुरायाच्या चरणी अर्पण केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST