Sambhaji Bhide Controversial Statement: संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे यवतमाळमध्ये विविध संघटना आक्रमक; उतरल्या रस्त्यावर - पंडित नेहरूंविषयी अपमानास्पद विधान
🎬 Watch Now: Feature Video
यवतमाळ : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांचे शनिवारी यवतमाळमध्ये व्याख्यान झाले. त्यावेळी त्यांनी पंडित नेहरूंविषयी अपमानास्पद विधान केले. या पूर्वी शुक्रवारी त्यांनी महात्मा गांधी यांच्याविषयीदेखील अपमानास्पद विधान केले होते. अखंड हिंदुस्थानासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे कोणतेही कर्तृत्व नसताना ते भारताचे पंतप्रधान झाले, अशी टीका संभाजी भिडे यांनी केली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, यवतमाळ विभागाच्या वतीने शनिवारी स्थानिक बलवंत मंगल कार्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याचा यवतमाळ शहरात निषेध करण्यात आल्या. त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे विविध संघटना रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. त्यांच्याविरूद्ध जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या निषेध नोंदविण्यात आला होता. नागरिक आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भिडे शनिवारी यवतमाळमध्ये काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र त्यांनी शनिवारी व्याख्यानात महात्मा गांधींवर भाष्य करणे टाळले. त्याऐवजी व्याख्यानात अखंड हिंदुस्थानाच्या प्रेमावरून पंडित जवाहरलाल नेहरू यांना लक्ष्य केले होते.