ETV Bharat / state

लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; ताम्हीणी घाटात बस उलटून 5 ठार - TAMHINI GHAT BUS ACCIDENT

पुण्यातून महाडला जाणाऱ्या वऱ्हाडाच्या बसला ताम्हीणी घाटात भीषण अपघात झाला. या अपघातात 5 वऱ्हाड्यांचा मृत्यू झाला. यात दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.

TAMHINI GHAT BUS ACCIDENT
उलटलेली खासगी बस (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 6 hours ago

पुणे : लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खासगी प्रवासी बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात 5 वऱ्हाड्यांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी पुणे महाड महामार्गावर ताम्हीणी घाटात घडली आहे. हे वऱ्हाड पुण्यातून महाड तालुक्यातील बिरवाडी इथं जाताना 5 जणांवर काळानं घाला घातला आहे.

खासगी प्रवासी बस उलटली : पुणे इथून जाधव परिवार बिरवाडी इथं लग्नानिमित्त जात होतं. यावेळी एका खासगी प्रवासी बसनं ( क्रमांक एस एच 14 जीयू 3404 ) सगळे वऱ्हाडी प्रवास करत होते. मात्र पुण्यातून बस निघून ताम्हीणी घाटात गेल्यानंतर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस उलटली. या घटनेत 5 वऱ्हाड्यांचा मृत्यू झाला. यात दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. मृतांमध्ये 1) संगिता धनंजय जाधव, 2) गौरव अशोक दराडे, 3) शिल्पा प्रदिप पवार, 4) वंदना जाधव, 5) अनोळखी पुरुष अजुन नाव कळालं नाही, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी झाली पलटी : माणगाव पोलीस ठाण्याच्या परिसरातील ताम्हीणी घाटात खासगी बस क्रमांक एस एच 14जीयू 3405 ही पलटी झाली आहे. पुण्यातील जाधव कुटुंबीय बिरवाडी इथं लग्न समारंभास जात होतं. यावेळी ताम्हीणी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं सदर गाडी पलटी झाली आहे. या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 27 जखमी वऱ्हाड्यांना बाहेर काढण्यात आलं. या जखमींना माणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं. बचाव पथक आणि पोलीस घटनास्थळी बचावकार्य करत आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. अमडापूरमध्ये 'हिट अ‍ॅन्ड रन'चा प्रकार; अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन युवक ठार
  2. 'लालपरी'च्या अपघातात घट झाल्याचा दावा ; नाशिक विभागात एसटीच्या 120 अपघातात 22 ठार, तर 196 जण जखमी
  3. कुर्ल्यानंतर पुन्हा बेस्ट बसचा अपघात; सीएसएमटी जवळ बेस्ट बस अपघातात एकाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.