Saibaba Rangoli at Shirdi :रामनवमीची शिर्डीत तयारी; चाळीस हजार स्केअर फुटांची साईबाबांची साकारली रांगोळी - Saibaba Rangoli at Shirdi
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14976668-thumbnail-3x2-asd.jpg)
शिर्डी ( अहमदनगर ) - शिर्डीत 111 व्या रामनवमी उत्सवाच्या ( Ram Navami celebration in Shirdi ) निमित्ताने साई नगरच्या दोन एकर मैदानात गोमूत्र, शेण मिसळून चाळीस हजार स्केअर फुटांची साईबाबांची भव्य अशी रांगोळी ( Saibaba Rangoli in Shirdi ) साकारण्यात आली आहे. या रांगोळीसाठी तब्बल 9 हजार किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. हा भव्य दिव्य असा रांगोळीने साकरलेला चेहरा रामनवमी उत्सवाच ( Ramnavami special Rangoli in Shirdi ) खास आकर्षण ठरला आहे. अद्भूत अशा रांगोळीसाठी रामनवमी यात्रा कमिटीच्यावतीने ( Ramnavami Yatra committee ) नियुक्त केलेल्या रांगोळी कमिटीचे अध्यक्ष मुकुंदराव गोंदकर, उपाध्यक्ष मनिलाल पटेल, प्रविण शिंदे, प्रकाश गोंदकर, विरेश चौधरी, प्रतिक शेळके, सोमनाथ कोते या ग्रामस्थांनी अहोरात्र मेहनत घेतली. याचबरोबर दिनेश शिंदे, दत्तात्रय कोते,सचिन औटी, नितीन गायकवाड, ऋषिकेश गायकवाड, जयंत गायकवाड, साईराज धुलसैदर, प्रथमेश गोंदकर, प्रमोद शेळके, नंदकुमार शेळके, सुनील बारहाते, योगेश काटकर, सतिश कोते, महेश कोते, नारायण थोरात, अरुण कोते, कैलास वारुळे, संतोष गोंदकर, अनिल कोते, रविशंकर गोंदकर, नकुल सोनवणे आदी ग्रामस्थांनी अहोरात्र मेहनत घेतली.