Sadashiv Lokhandes Video : संगमनेर शहरात शिवसैनिकांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या फोटोला फासले काळे - शिवसैनिकांनी खा लोखंडे यांच्या फोटोला फासले काळे
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे ( Shirdi Lok Sabha constituency ) शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली. ते शिंदे गटाला आणि भाजपला जाऊन मिळाले. लोखंडे यांना आम्ही शिवसैनिक कुठल्याही परिस्थितीत संगमनेर तालुक्यात फिरू देणार नाही. असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कतारी यांनी दिला. शिवसेनेच्या संगमनेर शहर ( Outside Senas Sangamner city office ) कार्यालयाबाहेर असलेल्या खासदार लोखंडे ( MP Lokhande ) यांच्या फोटोला शिवसैनिकांनी काळे फासले. गद्दार हे तुडवलेच जातील. खासदार सदाशिव लोखंडे यांना शिवसैनिकांनी आणि सर्वसामान्यांनी निवडून दिले. मात्र त्यांचे पक्षासाठी कोणतेही महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले नाही. आजवर त्यांची प्रतिमा ‘मिस्टर इंडिया’ अशीच आहे. त्यांना मतदारसंघातील प्रश्नच समजलेले नाहीत. शिवसैनिकांच्या सुख-दु:खात त्यांचा कधी सहभाग नव्हता. फितूर गटाला ते सामील झाले. शिवसेनेत गद्दारीला अजिबात थारा नाही. असा इशारा शिवसेनेचे नागपूरचे संपर्क प्रमुख नरेश माळवे यांनी दिला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST