RSS Sarkaryawah Dattatreya Hosabale: विचाराला विरोध असू शकतो, पण समाजात माणुसकी हाच आधार-दत्तात्रेय होसाबळे - दत्ताजी डिडोळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर : नागपुरमध्ये दत्ताजी डिडोळकर यांचा जन्मशताब्दी वर्ष समारंभ रविवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. विश्वास, संकल्प, आदर्शाप्रती प्रतिबद्ध असलेले दत्ताजी समाज, देशासाठी जगले. त्यांचे जीवनदर्शन, आदर्श व्यक्तिमत्व, कार्यपद्धतीला आत्मसात करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी केले. नाम साधर्म्यामुळे अनेकदा सन्मान मिळाल्याचे त्यांनी सांगितले. दत्ताजी डिडोळकर, यशवंतराव केळकर यांनी राष्ट्राच्या महानतेसाठी, भारतासारख्या प्राचीन राष्ट्राच्या भवितव्यासाठी, समाजाच्या उन्न्तीसाठी हजारो लोकांना तयार करण्याचे कार्य केले. विद्यार्थी परिषदेला अखिल भारतीय रुप देण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले, असेही त्यांनी सांगितले. वैचारिक विरोध, मतभेद असू शकतात, पण समाजात एकमेकांसोबत द्वेषाने जगले पाहिजे हे कोणी शिकविले नाही, असे ते म्हणाले. एकमेकांना माणुसकी, न्यायवृत्ती हाच आधार असतो. आपल्याला इतरांचा द्वेष करण्याची गरज नाही. कल्पनेला विरोध असू शकतो, पण माणुसकी, न्याय आणि समाजातील सहजीवनाच्या आधारे आपण इतरांचा द्वेष करू नये, असे दत्तात्रेय होसाबळे म्हणाले.