RPF Constable CCTV :आरपीएफ कॉन्स्टेबल देवदुतासारखा आला धावून, भुवनेश्वरमधील रेल्वेतून पडणाऱ्या महिलेचे वाचविले प्राण - रेल्वे पोलीस दल कॉन्स्टेबल सीसीटीव्ही
🎬 Watch Now: Feature Video
भुवनेश्वर - रेल्वे पोलीस दलाच्या (आरपीएफ) कॉन्स्टेबलच्या सतर्कतेमुळे ( alertness of a constable of RPF ) मंगळवारी भुवनेश्वर रेल्वे स्थानकावर ( Bhubaneswar Railway station ) महिला प्रवाशाचे प्राण वाचले आहेत. ही घटना रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ( Bhubaneswar RPF CCTV video ) झाली आहे. महिला प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक-3 वर पलासा-कटक पॅसेंजर ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. अचानक तिचा पाय घसरला. चालत्या रेल्वेमधून ती फलाटाच्या कडेला पडली. तेथे उपस्थित असलेले हेडकॉन्स्टेबल एस. मुंडा यांनी महिलेला रेल्वे खाली जाण्यापासून वाचवित प्लॅटफॉर्मवर ( RPF saved life of passenger ) ओढले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST