'लवासा जमीन घोटाळ्याची श्वेतपत्रिका काढू' तलाठी भरती परीक्षेवरून विखे पाटील आक्रमक

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 13, 2024, 6:52 PM IST

रत्नागिरी Talathi recruitment exam : सध्या तलाठी भरती परीक्षेमुळं वातावरण चांगलंच तापलं आहे. तलाठी भरती परीक्षेवर विरोधक विविध प्रश्न उपस्थित करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी परीक्षेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. केवळ निषेधार्थ हे आंदोलन सुरू असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना विखे म्हणाले की, गुणवत्ता यादी फक्त तलाठी भरती परीक्षेची का काढायची? पुण्यातील लवासा जमीन घोटाळ्याची श्वेतपत्रिकाही काढू. पुण्यातील किती जमिनी बिल्डरच्या घशात गेल्या? त्याचीही यादी काढूया. श्वेतपत्रिका फक्त तलाठी भारतीची का काढायची, असा प्रश्न विखे पाटील यांनी विरोधकांना केलाय.  

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.