Ravindra Singhal Fitness: आयपीएस अधिकारी रवींद्र सिंगल यांच्या फिटनेसचं रहस्य काय आहे? पाहा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई Ravindra Singhal Fitness : प्रत्येक यशामागं एक गुरु असतो. आयपीएस अधिकारी डॉ. रवींद्र सिंगल यांनी त्यांच्या फिटनेसचं रहस्य सांगताना त्यांच्या शिक्षकांची आठवण सांगितलीय. त्यांनी त्यांच्या फिटनेसंचं श्रेय क्रीडा शिक्षक चरणसिंग यांना दिलंय. त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलंय की, दिल्लीतील बलवंत राय मेहता विद्या भवन शाळेत शिकत असताना चरणसिंग हे त्यांचे क्रीडा शिक्षक होते. चरणसिंग यांनी रविंद्र सिंगल यांचं आयुष्य फिट करत करियरला यशस्वी कलाटणी दिलीय. क्रीडा शिक्षक चरणसिंग यांनी सिंगल यांना एक गोष्ट सांगितली होती की, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त व्यक्तीचं मानसिक संतुलन मजबूत असतं. तो मोठ्या समस्या सहजरित्या सोडवतो. सहजासहजी हार मानत नाही. चरण सिंग यांच्या या मूळ मंत्रानं त्यांच्या मनावर आणि मेंदूवर खोलवर छाप सोडली. तेव्हापासून आजपर्यंत तो फिटनेसचा मंत्र त्यांच्यासोबत आहे. आयपीएस होण्यासाठी तासनतास अभ्यास करावा लागतो, त्यासाठी रोजच्या व्यायामानं मानसिक संतुलन राखण्यास मदत झाली होती, असं डॉ. सिंगल सांगतात.