जेव्हा दिल्लीसह गुजरातला आग लागते, तेव्हा सरकारचं लक्ष जातं- रविकांत तुपकरांचा सरकारला 'हा' इशारा - पीक विम्याचे पैसे
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 14, 2024, 1:56 PM IST
|Updated : Jan 14, 2024, 2:06 PM IST
बुलढाणा Ravikant Tupkar Warns MH Government : ऑक्टोबर महिन्यापासून शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे, पंचनामे झालेल्या नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना न मिळाल्यानं, तसंच दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या शेतकऱ्यांकरीता नुसतं तोंडाची पानं पुसण्याचं काम सरकारनं केल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांना मदन न केल्यानं रविकांत तुपकर यांनी सरकारला पुन्हा एकदा अल्टीमेटम दिलाय. तुपकर यांनी म्हटलं की," येत्या 19 जानेवारी रोजी बुलढाण्यातील मलकापूर रेल्वे स्थानकावरुन मुंबई, दिल्ली, गुजरातकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे अडवणार आहोत. एक मोठा आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिलाय. कापसावर बोंड अळी, पीक विम्याचे पैसे व शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. मुख्यमंत्री पक्षाकरिता व निवडणुकीच्या दृष्टीनं दौरे करत आहेत. पण त्यांना शेतकऱ्यांकडं लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळं जेव्हा दिल्ली आणि गुजरातला आग लागते तेव्हा त्यांचं लक्ष वेधलं जातं असं म्हणत त्यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलाय.