राम मंदिराची निमंत्रण पत्रिका बघितली का? पाहा व्हिडिओ - निमंत्रण पत्रिका
🎬 Watch Now: Feature Video


Published : Dec 29, 2023, 7:58 PM IST
पुणे Ram Temple Invitation : येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथे राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. (Ram Mandir Inauguration) राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमासाठी काही मोजक्याच मंडळींना निमंत्रण देण्यात आलं आहे. आतापासून देशभरातून अनेक नागरिक अयोध्या येथे प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. (Ayodhya Ram Temple) सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून अयोध्या येथे 17 जानेवारी पासूनच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अशातच आता राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेची निमंत्रण पत्रिका व्हायरल झाली आहे. (Ram Idol Consecration) अतिशय सुंदर अशी ही पत्रिका बनविण्यात आली आहे. या निमंत्रण पत्रिकेत अयोध्या येथील माती देखील देण्यात आली आहे. तसंच रामचरित मानसची चौपाई देखील देण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रभू श्रीरामाची प्रतिमा असलेलं कॉइनही यामध्ये आहे. अशा पद्धतीची ही सुरेख निमंत्रण पत्रिका मान्यवरांना देण्यात आली आहे.