Beed Crime News: पाहा, आष्टीतील भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या डेअरीचा पर्दाफाश; 9 लाखांचे पावडर, रसायन जप्त - भेसळयुक्त दूध
🎬 Watch Now: Feature Video
बीड : बीडच्या आष्टीत पावडर आणि रसायनापासून भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या डेअरीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आष्टी शहरातील संभाजीनगर भागातील एका गोडाऊन छापा टाकत, डेअरीवर भेसळयुक्त दूध बनवण्यासाठी लागणारे पावडर आणि रसायनाचा मोठा साठा आष्टी पोलीस आणि अन्न प्रशासनाने जप्त केला आहे. विशेष म्हणजे हा गोरखधंदा राष्ट्रवादीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईत 132 पांढऱ्या गोण्या पावडर, पत्र्याचे 220 डब्बे रसायन असा 8 लाख 91 हजार 375 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी जगदंबा मिल्क ऍण्ड मिल्कसचे मालक तथा राष्ट्रवादी जिल्हाउपाध्यक्ष सतीश नागनाथ शिंदे यांच्यासह अन्य एकावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे. दरम्यान सतीश शिंदे हे फरार झाले आहे. नंदू मेमाणे नामक आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान सतीश शिंदे हे पावडर आणि रसायनापासून दूध बनवून ते पुणे येथे विकत असल्याची माहिती अन्न प्रशासनाचे सह आयुक्त इम्रान हाश्मी यांनी फोनवरून दिली आहे. मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी नॉट रिचेबल आहेत.