अबब..! लक्सरमध्ये आढळला 18 फूट लांबीचा अजगर - अजगर का रेस्क्यू
🎬 Watch Now: Feature Video
लक्सर: हरिद्वारच्या लक्सर वन प्रादेशिक परिक्षेत्रात असलेल्या लालपूर गावातील एका शेतकऱ्याच्या बोअरमध्ये महाकाय अजगर सापडल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट वाढली आहे. माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तासाभराच्या प्रयत्नानंतर अजगराची सुटका करून जंगलात सोडले. खानपूर ब्लॉकमधील लालपूर गावातील रहिवासी शेतकरी उदय सिंह यांच्या शेतातल्या ट्यूबवेलमध्ये अजगर दिसला. अजगराला पाहून शेतकरी चक्रावले. या महाकाय अजगराची बातमी गावात पसरल्यानंतर गावकऱ्यांनी अजगराला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. गावकऱ्यांनी अजगराची माहिती वनविभागाला दिली. काही वेळाने वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून महाकाय अजगराची सुटका केली. वनाधिकारी गौरव कुमार अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजगराची लांबी 18 फूट असून वजन सुमारे 60 किलो आहे. अजगराला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST