Vijay Diwas Celebration विजय दिवस सोहळ्यात कराडकरांनी अनुभवला पंजाबी गतका मार्शल आर्टचा थरार..पाहा व्हिडिओ - पंजाबी गतका मार्शल आर्ट
🎬 Watch Now: Feature Video
सातारा, बांगला मुक्ती लढ्यातील भारतीय सेनेच्या विजयाप्रित्यर्थ कराडमध्ये विजय दिवस साजरा केला जातो. vijay diwas celebration in Karad. शुक्रवारी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर झालेल्या मुख्य सोहळ्यात हजारो कराडकरांनी पंजाबी गतका मार्शल आर्टच्या कसरतींचा थरार Punjabi Gatka martial art अनुभवला. खासदार शरद पवार Sharad Pawar in karad या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शीख बांधवांनी सादर केलेल्या गतका मार्शल आर्टच्या कसरती व मल्लखांबावरील प्रात्यक्षिके पाहून उपस्थित थक्क झाले. पॅराग्लायडरच्या हवाई कसरतीने कराडकरांची मने जिंकली तर लष्कराच्या डॉग शो ला बालचमूंनी दाद दिली. प्रारंभी शरद पवार यांनी विजय स्तंभाला अभिवादन केले. त्यानंतर मान्यवरांना पोलीस आणि एनसीसी पथकाने मानवंदना दिली. कराडमधील महिलांनी शहरातून बाईक रॅली काढली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST