Pune Polices Beating Video पुणे पोलिसाकडून नागरिकांना बंद खोलीत मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल - Pune Polices Beating Citizens
🎬 Watch Now: Feature Video
पुणे पोलिसाकडून नागरिकांना बंद खोलीत मारहाण करण्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. त्यामुळे हे पोलीस जे आहेत, ते लोकांच्या संरक्षणासाठी आहेत की अन्याय करण्यासाठी असा प्रश्न आता पुण्यात निर्माण झालेला आहे. पुणे सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांचा पुन्हा एक धक्कादायक व्हिडिओ आला आहे. कारवाई करीत असताना नागरिकांना मारहाण करतानाचा हा प्रकार व्हिडिओमधून व्हायरल झाला आहे. राजेश पुराणिक यांनी एक महिन्यापूर्वी हाॅटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या महिला आणि मुलींना मारहाण केली होती. पुराणिक यांच्या विरोधात अनेक लोकांनी तक्रारी दिल्या आहेत. अमिताभ गुप्ता यांच्याकडे तक्रारी गेलेल्या असताना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता मात्र कारवाई करताना दिसत नाहीत. पोलिसांनीच घेतला कायदा हातात न्याय कोण देणार हाही प्रश्न आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST