Pune Metro पुणेकरांसाठी मेट्रोच गिफ्ट, या मार्गावर होणार मेट्रोची चाचणी - 90 टक्के काम पूर्ण
🎬 Watch Now: Feature Video
पुणे नव वर्षाचं पुणे आणि पिंपरी चिंचवड करांना आणखी एक गिफ्ट मिळणार आहे. Pune Metro पुणे मेट्रोकडून पिंपरी ते पुणे कोर्ट आणि पुणे कोर्ट ते वनाज, अशी ट्रायल रन आज घेतली जाणार आहे. Metro Pune Pcmc पिंपरी ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय रेल्वे स्टेशन दरम्यानची सेवा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या Prime Minister Narendra Modi हस्ते सुरू झालेली आहे. त्याच मेट्रोच्या पुढच्या टप्प्याची चाचणी आज पार पडेल, अशी घोषणा महा मेट्रोचे संचालक ब्रिजेश दिक्षितांनी केली आहे. Pune Metro News आज चाचणी होणाऱ्या टप्प्यातील 90 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा ही दिक्षितांनी केला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडकर ज्या मेट्रो ट्रायलची आतुरतेने वाट पाहत आहेत. ती मेट्रो ट्रायल आज पूर्ण होत आहे. पिंपरी चिंचवड ते पुणे कोर्ट, पुणे कोर्ट ते कोथरूड दरम्यान आज पुणे मेट्रोची तांत्रिक चाचणी पहिल्यांदाच होणार आहे. यापूर्वी पिंपरी ते फुगेवाडी आणि कोथरूड ते गरवारे कॉलेज असा मेट्रो मार्ग सुरू करण्यात आला होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST