Priyanka Gandhi Vadra Pune Visit : प्रियंका गांधी आज पुणे दौऱ्यावर; नेमकं काय आहे कारण? - काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी
🎬 Watch Now: Feature Video


Published : Oct 26, 2023, 12:13 PM IST
पुणे Priyanka Gandhi Vadra Pune Visit : काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी आज (26 ऑक्टोबर) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा पुणे दौरा कोणत्याही राजकीय हेतूनं नसून, त्यांचा हा दौरा खासगी असल्याचं सांगितलं जातंय. अनेकवेळा प्रियंका गांधी यांचा साधेपणा पाहायला मिळालायं. प्रियंका गांधी आज सकाळी साडेदहा वाजता पुणे विमानतळ येथे आल्या. प्रोटोकॉलनुसार पोलिसांची सर्व वाहनं तेथे असताना देखील त्या साध्या वाहनात गेल्याचं पाहायला मिळालं. विशेष बाब म्हणजे यावेळी त्यांनी उपस्थित काँग्रेस शहराध्यक्ष यांच्यासह विविध काँग्रेस नेत्यांच्या शुभेच्छादेखील स्वीकारल्या नाहीत. दरम्यान, सध्या देशभरात विधानसभा निवडणुकीच वारं वाहत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी या ठिक-ठिकाणी दौरे करत आहेत. असं असतानाच आज अचानक त्या पुणे दौऱ्यावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, त्यांचा हा दौरा खासगी असल्याचं सांगितलं जातंय.