प्रियांक खर्गे यांचं वीर सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान, प्रतिमेला चप्पला मारून भाजप युवा मोर्चाकडून निषेध, पाहा व्हिडिओ - Priyank Kharge controversial remark
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 8, 2023, 1:11 PM IST
|Updated : Dec 8, 2023, 1:33 PM IST
पुणे : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधात आज भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीनं तीव्र निदर्शन करण्यात आलं आहे. यावेळी आंदोलकांच्या वतीनं प्रियांक खर्गे यांच्या प्रतिमेला चप्पल मारून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येनं भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. बुधवारी प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र कर्नाटक विधानसभेच्या दालनातून काढून टाकण्यात यावे असं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी युवा मोर्चाचे अध्यक्ष करण मिसाळ म्हणाले की "स्वातंत्रवीर सावरकर यांचं जे देशासाठी योगदान आहे, ते खूपच महत्त्वाचं आहे. या प्रकरणी उद्धव ठाकरे यांची नेमकी भूमिका काय आहे हे त्यांनी सांगावं.