Maharashtra Political Crisis: असं घडतंय हे मी जाहीरपणे..; राष्ट्रवादीतील बंडाळीबाबत पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले, पाहा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
सातारा: राष्ट्रवादी कॉंग्रेस अंतर्गत झालेल्या बंडाळीचा महाविकास आघाडीवर कसलाही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडी ही आहे तशीच राहणार. (Prithviraj Chavan statement ) काही लोक गेल्याचा थोडा परिणाम होईल. (Rebellion in NCP) तो दुरूस्त करण्याचा प्रयत्न पवार साहेब करत असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. (Maharashtra Political Crisis) काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. (NCP Political Crisis) महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र काम करणार आहोत. आताच्या राजकीय घडामोडींच्या संदर्भात मी पूर्वी जाहीरपणे बोललो होतो; पण अडचणीत आलो. असं घडतंय हे त्याचवेळी माहीत होतं. मात्र, वाटाघाटी चालल्या होत्या. एकनाथ शिंदे यांना बाजूला करून अजित पवार यांना भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी शब्द दिला असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी ठामपणे सांगितले. यामुळे मविआमध्ये नव्या चर्चेला पेव फुटले आहे.