thumbnail

Pothole Filling Campaign : काँग्रेसचे वर्सोवा विधानसभेत खड्ड्यांविरोधात खड्डा भरो अभियान

By

Published : Jul 30, 2023, 10:15 PM IST

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई गेल्या काही वर्षांपासून खड्ड्यांची राजधानी बनत आहे. बीएमसी, सरकारचे लाख दावे करूनही शहरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले दिसतात. त्यामुळे मुंबई काँग्रेसचे वर्सोवा विधानसभेत मतदार संघात खड्ड्यांविरोधात खड्डा भरों अभियान राबवण्यात आले आहे. सातत्याने लोकांच्या मृत्यूचे कारण बनत आहेत, असे काँग्रेस नेत्या मोनिका जगताप यांनी म्हटले आहे. मुंबईला लागून असलेल्या अंधेरी परिसरात पुन्हा एकदा रस्त्यांवर खड्डे पडले आहेत पावसाळा, पाणी साचणे, खराब रस्ते, खड्डे हे समीकरण मुंबईकरांसाठी नवीन नाही. मात्र, सरकारी यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  विधानसभेत केलेल्या भाषणात येत्या 2 वर्षात रस्ते खड्डेमुक्त करू, असे आश्वासन राज्यातील जनतेला दिले होते. मात्र मुंबईतील खड्डे काही कमी होतांना दिसत नाही. एकट्या मुंबईत गेल्या काही महिन्यांत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे 9 जणांचा बळी गेला आहे. तसेच राज्यभरात आतापर्यंत 120 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.