शारजाह BANW vs ENGW Live Streaming : ICC महिला T20 विश्वचषक 2024 सुरु झाला आहे. T20 विश्वचषकाचा सहावा सामना आज बांगलादेश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात होणार आहे. उभय संघांमधला हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. बांगलादेशची कमान निगार सुलतानाच्या हाती आहे. तर इंग्लंडची कर्णधार हेदर नाइट आहे.
Australia and England enter #T20WorldCup 2024 proceedings 👀
— ICC (@ICC) October 5, 2024
Can Sri Lanka or Bangladesh cause a shock in Sharjah?
More 📺📝 https://t.co/NDorUljKGt#WhateverItTakes pic.twitter.com/pEyPedo8qM
इंग्लंडचा पहिला सामना : इंग्लंडचा संघ या सामन्यानं स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. T20 विश्वचषक सुरु होण्यापूर्वी इंग्लंडनं दोन सराव सामने खेळले. पहिल्या सामन्यात इंग्लंडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 33 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी, दुसऱ्या सामन्यात संघानं न्यूझीलंडचा 5 गडी राखून पराभव केला. तर दुसरीकडे स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बांगलादेश संघानं स्कॉटलंडवर 16 धावांनी शानदार विजय नोंदवला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशनं 7 गडी गमावून 119 धावा केल्या. प्रत्युत्तरात स्कॉटिश संघाला 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 103 धावा करता आल्या.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड : बांगलादेश महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यात एकूण तीन T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यात इंग्लंड संघानं तिन्ही सामने जिंकले आहेत. त्याचवेळी बांगलादेशचा संघ इंग्लंडविरुद्ध पहिल्या विजयाच्या शोधात आहे. या सामन्यात इंग्लंड संघाचं पारडं जड असल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होतं.
Australia and England enter #T20WorldCup 2024 proceedings 👀
— ICC (@ICC) October 5, 2024
Can Sri Lanka or Bangladesh cause a shock in Sharjah?
More 📺📝 https://t.co/NDorUljKGt#WhateverItTakes pic.twitter.com/pEyPedo8qM
खेळपट्टीचा अहवाल कसा : शारजाह क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. या मैदानावर फिरकीपटूंनाही चांगली मदत मिळते. या खेळपट्टीवर गोलंदाजी करताना संथ वळणे घेणाऱ्या गोलंदाजांचा वरचष्मा असतो. मात्र मैदान लहान असल्यानं त्याचा फायदा फलंदाजही घेऊ शकतात. या खेळपट्टीवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 135 धावांची आहे. इथं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य असू शकतो.
हवामान कसं असेल : शारजाहच्या हवामान अंदाजानुसार, सामन्यादरम्यान दुपारी सूर्यप्रकाश येण्याची शक्यता आहे. तर पावसाची किमान शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Want to go behind the scenes with us? 👀
— England Cricket (@englandcricket) October 3, 2024
Discover an exclusive insight into our #T20WorldCup preparations 👇#EnglandCricket
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा सहावा सामना बांगलादेश महिला विरुद्ध इंग्लंड महिला सामना कधी खेळला जाईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा सहावा सामना बांगलादेश महिला विरुद्ध इंग्लंड महिला सामना शनिवार, 5 ऑक्टोंबर रोजी होणार आहे.
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा सहावा सामना बांगलादेश महिला विरुद्ध इंग्लंड महिला सामना कुठं खेळवला जाईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा सहावा सामना बांगलादेश महिला विरुद्ध इंग्लंड महिला सामना शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह इथं होणार आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा सहावा सामना बांगलादेश महिला विरुद्ध इंग्लंड महिला सामना किती वाजता सुरु होईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा सहावा सामना बांगलादेश महिला विरुद्ध इंग्लंड महिला सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 07:30 वाजता सुरु होईल.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा सहावा सामना बांगलादेश महिला विरुद्ध इंग्लंड महिला सामना टीव्हीवर कुठं पाहायचा?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा सहावा सामना बांगलादेश महिला विरुद्ध इंग्लंड महिला सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
Australia and England enter #T20WorldCup 2024 proceedings 👀
— ICC (@ICC) October 5, 2024
Can Sri Lanka or Bangladesh cause a shock in Sharjah?
More 📺📝 https://t.co/NDorUljKGt#WhateverItTakes pic.twitter.com/pEyPedo8qM
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा सहावा सामना बांगलादेश महिला विरुद्ध इंग्लंड महिला सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहायचं?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा सहावा सामना बांगलादेश महिला विरुद्ध इंग्लंड महिला सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर पाहू शकाल.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
बांगलादेश : शती रानी, मुर्शिदा खातून, शोभना मोस्तारी, तेज नेहर, निगार सुलताना (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शोर्ना अख्तर, रितू मोनी, फहिमा खातून, राबेया खातून, निहादा अख्तर, मारुफा अख्तर.
इंग्लंड : डॅनी व्याट, ॲलिस कॅप्सी, सोफिया डंकले, नॅट सायव्हर-ब्रंट, हेदर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (यष्टीरक्षक), सोफी एक्लेस्टोन, डॅनियल गिब्सन, चार्ली डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल.
हेही वाचा :