ETV Bharat / state

राहुल गांधी यांचा भाजपावर हल्लाबोल; शिवरायांचा पुतळा पडण्याचं सांगितलं कारण - Rahul Gandhi Reach At Kolhapur - RAHUL GANDHI REACH AT KOLHAPUR

विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज सकाळी कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. यावेळी भाजपा नेत्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी राहुल गांधी ऑटो चालकाच्या घरी गेले.

Rahul Gandhi Reach At Kolhapur
विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2024, 11:30 AM IST

Updated : Oct 5, 2024, 12:04 PM IST

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या काळी स्वराज्याची स्थापना केली. मात्र त्यांचा राज्याभिषेक करण्यास एका विशिष्ट विचारधारेनं त्यांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला. त्याच विचारधारेशी आपण आता लढत आहोत. आपली लढाई त्या विचारधारेशी आहे. "शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानं यांना इशारा दिला. पुढच्या वेळी पुतळा उभारला, तर चांगल्या विचारानं उभारा, मात्र तुम्ही चुकीच्या विचारधारेनं पुतळा उभारला. त्यामुळे तो पुतळा कोसळला," असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी यावेळी कोल्हापुरात केला.

राहुल गांधींनी सांगितलं शिवरायांचा पुतळा पडण्याचं कारण : "छत्रपती शिवाजी महाराज यांनी हजारो वर्षापूर्वी राज्याभिषेक केला. मात्र या विचारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करू दिला नाही. तीच विचारधारा आजही देशात आहे. शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला. मात्र तो पुतळा काही दिवसातच कोसळला. कारण यांची विचारधारा चुकीची आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानं यांना इशारा दिला. पुढच्या वेळी पुतळा उभारला, तर चांगल्या विचारानं उभारा, मात्र तुम्ही चुकीच्या विचारधारेनं पुतळा उभारला. त्यामुळे तो पुतळा कोसळला," असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी यावेळी केला.

भाजपानं दाखवले काळे झेंडे : काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी काही वेळापूर्वी कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. राहुल गांधी विमानतळावर दाखल होताच भाजपा नेत्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं. भाजपा नेत्यांनी राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन भाजपा नेत्यांना अटकाव केला. यावेळी भाजपा नेते आक्रमक झाले.

राहुल गांधींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण : कसबा बावडा येथे शिवछत्रपतींच्या बहूशस्त्रधारी पुतळ्याचं अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून हा पुतळा बसवण्यात आला आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यानं पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसनं जोरदार तयारी सुरू केली.

हेही वाचा :

  1. "मोहब्बत की दुकानात काय चाललंय?", कोरपना अत्याचार प्रकरणावरुन चित्रा वाघ यांंचा राहुल गांधींसह विरोधकांवर हल्लाबोल - Chandrapur Girl Abused
  2. राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा तडकाफडकी रद्द, नेमकं कारण काय? - Rahul Gandhi Kolhapur Visit
  3. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी राहुल गांधींना बजावले समन्स - Vinayak Savarkar Defamation Case

Last Updated : Oct 5, 2024, 12:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.