ETV Bharat / health-and-lifestyle

सावधान! बाजारात बनावट पनीर; अशी ओळखा भेसळ - How To Identify Fake Paneer - HOW TO IDENTIFY FAKE PANEER

How To Identify Fake Paneer: एखादं सन असो वा सेलिब्रेशन प्रत्येकाच्या घरात पनीरची भाजी हमखास असते. परंतु बाजारात बनावट पनीर विकला जातो. तो कसा ओळखाल?

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Lifestyle Team

Published : Oct 5, 2024, 12:05 PM IST

How To Identify Fake Paneer : हल्ली आपल्या घरात पनीरपासून बनलेल्या पदार्थांचा समावेश वाढला आहे. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी सहज उपलब्ध होणारं पनीर सर्वांच्या आवडीचं झालंय. एखादं सेलिब्रेशन असो वा सन, पनीरची भाजी हमखास मेन्युमध्ये असतेच. पनीरची हिच वाढलेली डिमांड पाहता बाजारात बनावट पनीरची सर्रास विक्री होत आहे. हे पनीर इतकं घातक आहे की शरीरात गेल्यास आरोग्यविषयक अनेक समस्या उद्भवू शकतात. एवढंच नाही तर, बनावट पनीर इतकं पद्धतशीर तयार केलं असतं की भेसळयुक्त आणि शुद्ध पनीर ओळखता येत नाही. आज हेच भेसळयुक्त पनीर ओळखण्याचे काही टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत.

How To Identify Fake Paneer
पनीर भाजी (ETV Bharat)
  • आयोडिन चाचणी : सर्वप्रथम पनीरचा एक लहान तुकडा घ्या. एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात पनीर घाला. पाच मिनिटं उकळा. उकळल्यानंतर पनीर एका प्लेटमध्ये घ्या. थंड झाल्यानंतर त्यावर आयोडीन टिंचरचे दोन थेंब टाका. जर पनीर हलका निळा दिसेल तर याचा अर्थ पनीर बनवताना दुधात कृतिम घटक घातले गेले आहेत. तसेच हे भेसळयुक्त आहे.
  • प्रेशर टेस्ट : बाजारातून आणलेला पनीर एका प्लेटमध्ये ठेवा. आता त्याला अगदी हलक्या हाताने कुस्करून पहा. बनावट पनीर कुस्ककेल्यास लगेच तुटते. अस्सल पनीर लवकर तुटत नाही.
  • तूर डाळ: एका भांड्यात पाणी घ्या. पनीरचा तुकडा घ्या. त्यात एक चमचा तूर डाळ घाला. दहा मिनिटं उकळा. उकळल्यानंतर पनीर लाल रंगाचं दिसत असेल तर त्यात डिटर्जंट किंवा युरिया असू शकतो.
  • पनीर विकत घेण्यापूर्वी तपासा: पनीर घेताना एक लहान तुकडा खावून बघा. खाल्लानंतर पनीर कडक किंवा रबरी वाटत असेल तर त्यात कृत्रिम घटक असून शकतात. कारण अस्सल पनीर नरम असतं.
How To Identify Fake Paneer
पनीर भाजी (ETV Bharat)

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. डासांपासून हैराण? घराभोवती लावा ही झाडं; डास होतील छूमंतर - Plants that keep mosquitoes away
  2. तुम्हालाही दीपिका पदुकोणसारखी त्वचा हवी काय? दीपिकाच्या न्युट्रिशियननं सांगितल्या 'या' टिप्स - Deepika Padukone

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.