ETV Bharat / state

नागपुरात देशातील पहिला 'चार मजली उड्डाणपूल' सुरू; गडकरी म्हणाले, "वरदान ठरणार" - Nagpur Double Decker Flyover Bridge - NAGPUR DOUBLE DECKER FLYOVER BRIDGE

नागपुरात देशातील पहिला चार मजली डबल डेकर उड्डाणपूल आजपासून (5 ऑक्टोबर) सुरू झालाय. या पुलाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते झालं.

Nagpur Double Decker Flyover Bridge inauguration by central minister Nitin Gadkari on today 5th oct 2024
नागपूर देशातील पहिला चार मजली उड्डाणपूल (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2024, 12:22 PM IST

Updated : Oct 5, 2024, 5:59 PM IST

नागपूर : नागपूर शहरातील एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौक दरम्यान 5.67 किलोमीटर लांबीचा देशातील पहिला चारस्तरीय म्हणजेच तब्बल चार मजली डबल डेकर उड्डाणपूल आजपासून (5 ऑक्टोबर) सुरू झाला. तांत्रिक दृष्ट्या अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या या पुलाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं.

डबल डेकर उड्डाणपूल नागपूरसाठी ठरणार वरदान - नितीन गडकरी : "नागपूरमधील पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल झालेला आहे. हे शहर हळूहळू बदलत आहे. त्यात आता एलआयसी ते ऑटोमोटिव्ह चौक या डबल डेकर उड्डाणपुलाची भर पडली आहे. हा उड्डाणपूल नागपूरकरांसाठी वरदान ठरणार आहे," असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलाय.

नागपूर विमानतळ ते कामठी हे अंतर अवघ्या २० मिनिटांत : एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौक डबल डेकर उड्डाणपुलामुळे नागपूर विमानतळ ते कामठी हे अंतर अवघ्या २० मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. "वेगळा आणि भव्य असा हा नवीन पूल नागपूरकरांच्या सेवेत आला आहे. या पुलाच्या निर्माणासाठी आलेल्या अडचणी दूर करण्याचे काम जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी केले. तर मेट्रोने अत्यंत कमी खर्चात पूल साकारला आहे," याचा गडकरी यांनी आवर्जुन उल्लेख केला.

ही आहेत पुलाची वैशिष्ट्ये :

  • 5.67 किमीचा हा डबलडेकर उड्डाणपूल सिंगल कॉलम पिलरवर उभा असून स्थापत्य कलेचं हे एक अद्भूत उदाहरण आहे.
  • या प्रकल्पाची किंमत 573 कोटी रुपये आहे.
  • उड्डाणपुलावर गड्डीगोदाम चौक, कडबी चौक, इंदोरा चौक, नारी रोड, ऑटोमोटिव्ह चौक ही पाच मेट्रो स्थानकं बांधण्यात आली आहेत.
  • उड्डाणपुलाच्या पहिल्या स्तरावर महामार्ग, दुसऱ्या स्तरावर मेट्रो तर जमीन पातळीवर आधीच अस्तित्वात असलेला महामार्ग आहे.
  • गड्डीगोदाम येथील गुरुद्वाराजवळ हा 1650 वजन क्षमतेचा स्टीलचा पूल तयार करण्यात आलाय. देशातील ही पहिलीच रचना आहे, ज्यामध्ये चार स्तरीय वाहतूक व्यवस्था आहे.
  • उड्डाणपुलाच्या संरचनेत ‘रिब अ‍ॅन्ड स्पाइन’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय.
  • या उड्डाणपुलाचं बांधकाम अतिशय गुंतागुंतीचं आणि अवघड होतं. विशेषत: गड्डीगोदाम येथे असलेला भूमिगत मार्गातील वाहतूक आणि रेल्वे मार्गावर सतत रहदारी असल्यामुळं भारतीय रेल्वेकडून एकूण 24 तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता.
  • या उड्डाणपुलामुळं कामठी मार्गावरील होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कामठीहून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना या उड्डाणपुलावरून थेट प्रवास करता येणार असल्यानं त्यांचा वेळ आणि इंधनाचीही बचत होईल.
  • वर्धा आणि कामठी या दोन्ही बहुस्तरीय मार्गाची बेरीज केली तर महामेट्रोनं सुमारे 9 किमीचा डबल डेकर उड्डाणपूल बांधलाय.

गड्डीगोदाम (गुरुद्वारा) येथे 4 स्तरीय वाहतूक व्यवस्था : महामेट्रोनं निर्माण कार्य करत भारतीय रेल्वे ट्रॅकच्यावर 80 मीटर लांब आणि 1650 टन वजनाचे स्टील गर्डर यशस्वीरीत्या लॉंच केले होते. भारतीय रेल्वे ट्रॅकच्यावर 1650 टन वजनाचे स्टील गर्डर स्थापित होणे हा अनोखा रेकॉर्ड आहे. स्थापित करण्यात आलेल्या 800 टन वजनाच्या स्टील गर्डरला 32000 एएसएफजी (हाईट स्ट्रेंथ फ्रिक्शन ग्रीप) बोल्टचा उपयोग करण्यात आला असून संपूर्ण स्ट्रक्चरला 80,000 बोल्टचा वापर केला गेला. जमिनीपासून स्टील गर्डरची उंची 25 मीटर इतकी आहे. रेल्वेच्या इतिहासात प्रथमच 22 मीटर रुंद स्टील गर्डर स्थापित करण्यात आला.

हेही वाचा -

  1. बर्फीवाला उड्डाणपुलासह गोखले पूल वाहतुकीसाठी खुला; 'या' वाहनांच्या वाहतुकीला आहे मनाई - Gokhale and Barfiwala Bridge Open
  2. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 10 मिनिटांत, 'कोस्टल रोड' आजपासून प्रवासासाठी खुला - Mumbai Coastal Road
  3. मुंबईत बनतोय केबल ब्रिज; तीन वर्षात काम होणार पूर्ण - Madh Versova Cable Bridge

Last Updated : Oct 5, 2024, 5:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.