उत्तर प्रदेशात पिलीभितमध्ये पोलिसांचा नागिन डान्स स्वातंत्र्यदिनी डीजवर अचानक लागले गाणे आणि पोलिसांनी सुरू केला डान्स - Indian Independence day
🎬 Watch Now: Feature Video
उत्तर प्रदेशात पिलीभीत जिल्ह्यातील पुरनपूर पोलीस ठाण्यात ध्वजारोहण केल्यानंतर पोलिसांनी नागिन डान्स करून स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा केला. प्रत्यक्षात पोलीस ठाण्यात डीजेवर देशभक्तीपर गाणी सुरू असताना अचानक डीजेवर नागिनची धून वाजू लागली. यादरम्यान पोलीस ठाण्यात तैनात एक हवालदार नाचू लागले. त्यानंतर सगळेच नाचायला लागले. पोलिस ठाण्यातला याचा व्हिडिओ एका तरुणाने बनवला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलीस ठाण्यात नागिन नृत्य सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे प्रमुख अशोक पाल यांनी डीजेवर वाजणारी धून बंद करून केवळ देशभक्तीपर गाणी वाजविण्याच्या सूचना दिल्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST