Beed Violence : बीडमधील हिंसाचाराचा मास्टरमाईंड कोण? पोलीस अधीक्षकांचा मोठा दावा - बीड हिंसाचारावर पोलिसांचे मत
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 4, 2023, 4:03 PM IST
बीड Police On Beed Violence : बीडमधील हिंसेचा मास्टरमाईंड स्थानिकच असल्याचा दावा पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) नंदकुमार ठाकूर (NandKumar Thakur) यांनी केलाय. याप्रकरणी 66 गुन्हे दाखल असून, 144 लोकांना अटक करण्यात आली आहे. 300 लोकांची चौकशी केली आहे. या संपूर्ण जाळपोळ आणि दगडफेकीच्या प्रकरणातील मास्टरचा पोलीस पथक कसून तपास करत आहे. पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर मिळालेल्या व्हिडिओमधून आरोपी शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचा देखील दावा नंदकुमार ठाकूर यांनी केलाय.
राजकीय नेत्यांचं घरं जाळली : 30 ऑक्टोबर रोजी सकाळी मराठा आंदोलकांमधील काही समाजकंटकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचं घर पेटवलं होतं. त्यांच्या घरावर तुफान दगडफेकही केली होती. त्यानंतर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आणखी एक आमदार संदीप क्षीरसागर यांच्या राहत्या घरावर हल्ला केला होता. त्यांनी संदीप क्षीरसागर यांचं घर पेटवलं होतं. तसेच माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या ऑफीसलाही आग लावली होती.