Kicked The Stall Food:व्हिडिओ व्हायरल झाल्याने अधिकारी अडचणीत; महापालिकेच्या अतिक्रमण उपायुक्तांनी मारल्या स्टॉलवरील अन्नाला लाथा - अतिक्रमणावर कारवाई
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : पुणे महापालिकेत प्रशासक राज्य आल्यापासून शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण कारवाई केली जात आहे. अश्यातच शहरात महापालिकेच्या वतीने अतिक्रमण कारवाई करताना अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे, असे असले तरी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वतीने देखील आत्ता कारवाई करताना रस्त्यावरील स्टॉल धारकांच्या दुकानातील अन्नाला लाथा मारल्या जात आहे. पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर अतिक्रमणाची कारवाई करायला गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण उपायुक्त असलेल्या माधव जगताप यांनी अधिकारी गुंडासारखे सगळे स्टॅाल लाथेने उडवून लावले आहे. ही कारवाई 5 एप्रिलची आहे. याचा सीसीटिव्ही व्हिडियो समोर आला आहे. एकीकडे शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमणावर कारवाई करावी, म्हणून मागणी होत असताना तिथे कोणतीही कारवाई न करणारे महापालिका अधिकारी गरीब व्यावसायिकांचे स्टॅाल लाथेने उडवून लावत आहे. आत्ता या प्रकाराची महापालिका आयुक्तांकडे ही तक्रार करण्यात आली आहे. माधव जगताप यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. या व्हायरल व्हिडिओची ईटीव्ही भारत पुष्टी करत नाही.