ETV Bharat / state

ऊसतोड मजुराचा मुलगा अदिनाथ खैरे हस्ताक्षर स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यात पहिला - HANDWRITING COMPETITION

ऊसतोड मजुराचा मुलगा हस्ताक्षर स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यात पहिला आला आहे. अदिनाथ खैरे असं या मुलाचं नाव असून त्यानं शाळेची मान उंचावली आहे.

अदिनाथ खैरे
अदिनाथ खैरे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2025, 1:11 PM IST

शिर्डी (अहिल्यानगर) - नेवासा तालुक्यातील साळवेवस्ती जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असलेला अदिनाथ मोहन खैरे याने जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेतील बाल गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आईवडिलांच्या हाती ऊसतोडीचा कोयता तर कधी मजुरीच्या निमित्ताने खोरं, घमेलं असलं तरी त्यांच्या मुलानं हातात पाटी, पेन्सिल घेऊन हस्ताक्षरात जिल्ह्यात झेंडा फडकावला आहे.

साळवे वस्ती जिल्हा परिषद शाळेत 59 पट असून येथे मुख्याध्यापिका प्रिया प्रभुणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक रवी महागावे यांनी तीन वर्षांपासून नियमित शिक्षणाचे धडे देताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी वक्तृत्व, नृत्य, रांगोळी आर्ट टीचर प्रमाणे फळा रंगवण्याची कला चिमुकल्यांना शिकवत आहेत. दोन वर्षांपासून महागावे सर हस्ताक्षराचे पाठ गिरवून घेत असल्याने त्यांच्या कष्टाला अदिनाथच्या रुपाने फळ मिळाले आहे.

जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर साळवे वस्ती जिल्हा परिषद शाळेचं नाव तालुक्यात चर्चेत आलं आहे. शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी अदिनाथला खांद्यावर घेऊन आनंदोत्सव साजरा केला असून इतर पालक आणि ग्रामस्थांनी त्यास पन्नास, शंभर आणि दोनशे रुपये बक्षीस देऊन पाठीवर शाबासकी दिली आहे. पत्र्याच्या तुटक्या, फुटक्या घरात आई उषा, वडील मोहन तसंच आजी सुभाबाई राहात आहेत. घरात जगण्याचा संघर्ष आणि कष्टाची धडपड असली तरी अदिनाथची पुढील शैक्षणिक पायवाट खडतर आणि काटेरी असल्यानं सुंदर अक्षर असलेल्या चिमुकल्याचं शैक्षणिक स्वप्न सुंदर होण्यासाठी दानशूर हातांची गरज आहे.

पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील सहावीत शिकणाऱ्या साई आंबेकर या विद्यार्थ्यानं जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. साईला आजी आसराबाई यांचं पाठबळ आणि मार्गदर्शनामुळे हे यश मिळालय.

हेही वाचा..

  1. मोत्यासारखं सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या ऊसतोड मजुराच्या मुलाची प्रेरणादायी कहाणी
  2. ऑनलाईन शिक्षणानं लिहिण्याची सवय सुटली, उन्हाळ्याच्या सुट्ट्यात विद्यार्थ्यांची हस्ताक्षर कार्यशाळेला पसंती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.