PM Modi Shirdi Visit : मोदींच्या दौऱ्यासाठी लोकांना घ्यायला आलेल्या बसेस मराठा बांधवांनी पाठविल्या परत - Maratha Protesters On Modi Visit

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 5:40 PM IST

शिर्डी (अहमदनगर) PM Modi Shirdi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरुवारी) शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत. साईबाबांच्या दर्शनानंतर मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचं लोकार्पण करण्यात येणार आहे. (Maratha Protesters On Modi Visit) पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रत्येक गावात एसटी महामंडळाच्या बसेस नागरिकांना आणण्यासाठी पाठवण्यात आल्या होत्या. (Maratha protesters sent back buses) मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. (PM Narendra Modi) त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथील मराठा बांधवांनी तीव्र विरोध करत या बसेस परत पाठविल्या आहेत. मोदींच्या सभेसाठी आम्ही जाणार नाही आणि कोणाला जाऊ देणार नाही, अशी भूमिका मराठा बांधवांनी घेतली आहे. यावेळी रंगनाथ गव्हाणे, कैलास गव्हाणे, प्रविण गव्हाणे, नवनाथ गव्हाणे, सोमनाथ गव्हाणे, विजय गव्हाणे, रघुनाथ गव्हाणे, रमेश गव्हाणे, उत्तम गव्हाणे, संतोष गव्हाणे आदी शेतकरी बांधवांनी पुढाकार घेऊन नागरिकांना घेण्यासाठी आलेल्या बसेस परत पाठविल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.