टँकर चालकांच्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल; पाहा व्हिडिओ - Tanker drivers strike
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 2, 2024, 10:25 PM IST
बीड : बीड जिल्ह्यात अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल नसल्यामुळं नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागल आहे. एकीकडं केंद्र शासनाच्या विरोधात वाहतूक संघटनांनी बंद पुकारला आहे. तर, दुसरीकडं या संपामुळं सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय.केंद्राच्या प्रस्तावित मोटार वाहन कायद्याच्या विरोधात पेट्रोल, डिझेल वाहतूकदार संघटना संपावर गेल्या आहेत. त्यामुळं राज्यातील इंधन पुरवठा कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. याशिवाय या आंदोलकांनी सोमवारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ठिय्या आंदोलन केलं, यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर लाठीमारहल्ला केल्याची घटना घडली आहे. तसंच आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेकही केलीय त्यामुळं एकच गोंधळ उडाला होता. या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व टँकर चालकांनी सहभाग घेतलाय. त्यामुळं वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. त्याचा प्रत्यय मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आला आहे. या ठिकाणी सकाळपासून 10 ते 15 किमी लांबीची वाहने अडकून पडली आहेत.