'उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी काय दिवे लावले, पीएचडी करणं पक्ष बदलण्याइतकं सोपं नाही' - Deputy Chief Minister Ajit Pawar
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 13, 2023, 3:49 PM IST
|Updated : Dec 13, 2023, 4:28 PM IST
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधान परिषदेत फेलोशिप तसंच पीएचडी संशोधकांसंदर्भात धक्कादायक वक्तव्य केलं होतं. पीएचडी करुन संशोधक दिवे लावणार का, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळं राज्यभरातून संशोधक विद्यार्थ्यांनी अजित पवारांविरोधात आंदोलन तीव्र केलं आहे. अजित पवारांच्या वक्तव्यामुळं राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या फेलोशिपला विरोध करत असल्याचं दिसून येत आहे. 'दहावी नापास असलेल्या अजित पवारांनी आम्हाला शिकवू नये, पीएचडी पक्ष बदलण्याइतकं सोपं नाहीये. तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून राज्यात काय दिवे लावले. तुम्हाला राज्याचे मुख्यमंत्री व्हायचंय. त्यासाठी तुम्ही बंडखोरी केली. त्यामुळं तुम्ही राज्यात मुख्यमंत्री होऊन काय दिवे लावणार आहात, ते आधी आम्हाला सांगा, त्यानंतर तुम्हाला पीएचडीबद्दल सांगू', अशी प्रतिक्रिया संशोधक विद्यार्थ्यांनी दिली आहे.