पालघर ते अयोध्या सायकल यात्रा; रामलल्लाच्या दर्शनासाठी तरुण 1600 किलोमीटरच्या सफरीवर - श्रीराम प्रतिष्ठापना
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 28, 2023, 3:11 PM IST
पालघर Palghar To Ayodhya Cycle Yatra : अयोध्येवरुन आलेल्या अक्षता आणि मंगल कलशाच्या यात्रा गावोगाव निघाल्या आहेत. अयोध्येतील मंदिरात श्रीराम प्रतिष्ठापनेची निमंत्रणं घरोघर पोहोचवली जात आहेत. पालघरमधील यश येवले आणि अंकेश गुप्ता हे दोन युवक मात्र थेट अयोध्येला सायकलवर निघाले आहेत. आत्तापर्यंत त्यांचा तीनशे किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे. यश आणि अंकेश स्वतःला भाग्यशाली पिढीचे प्रतिनिधी मानतात. वर्षानुवर्षे ज्या श्रीराम मंदिराची प्रतीक्षा होती, ते आता प्रत्यक्षात येत असल्यानं त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. श्रीराम प्रतिष्ठापना 22 जानेवारीला असून त्या अगोदरच तिथं जाऊन श्रीराम चरणी नतमस्तक होण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परस्परांना सहकार्य करीत जाती, जातीत झालेली विभागणी कशी दूर करायची, देव, धर्म आणि देश याला प्राधान्य कसं द्यायचं हा त्यांच्या सायकल यात्रेमागचा उद्देश असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.