Maharashtra Budget 2023 : अर्थसंकल्पीय अधिवेशन; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : राज्य सरकारचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान, आजही विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यापासून आक्रमक झाले होते. त्यातच या आठवड्यात दोन दिवस सतत पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन त्यांचे अतोनात हाल झाले आहेत. या प्रश्नावर विरोधकांनी कालही सभागृहामध्ये सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता. आजही कामकाज सुरू होण्याच्या पूर्वी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आंदोलन छेडले. दरम्यान, राज्य सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकारच्या या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कुठल्या योजना जाहीर होतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.