नांदेड रेल्वे स्थानकावर पॅसेंजर ट्रेनला आग; एक डबा जळून खाक - पॅसेंजर ट्रेनला आग
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 26, 2023, 3:04 PM IST
नांदेड : passenger train caught fire रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या पूर्णा-परळी पॅसेंजर ट्रेनला आग, ट्रेनचा एक डबा जळून खाक, हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक 4 वर उभ्या असलेल्या पूर्णा परळी पॅसेंजर ट्रेनच्या डब्याला आग लागली. ही आग मंगळवारी 26 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास लागली. आगीच्या घटनेत जीवितहानी झाली नाही. यामध्ये कोणाचाही सहभाग असल्याची कोणतीही बातमी नाही. रेल्वे प्रशासन आणि महानगर पालिकेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली आहे. परळी पूर्णा ट्रेनमध्ये आग कशी लागली या घटनेचा तपास सुरू आहे. आगीच्या घटनेनं रेल्वे स्टेशनवर प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरले होतं. महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या वतीनं आग विझवण्यासाठी तत्परता दाखवून आग आटोक्यात आणली. रेल्वे प्रशासनाच्या वतीनं रेल्वे स्थानकावरून डबा इतर ठिकाणी हलवण्यात आला आहे. रेल्वे विभागाच्या वतीने घटनेतील संपूर्ण माहिती दिली नाही या घटनेच्या तपास करत असल्याचं महिती देण्यात आली.