Sharad Purnima 2022: कोजागिरी पौर्णिमेला चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा - आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक कोजागिरी पौर्णिमेस Kojagiri Purnima होणाऱ्या अतीप्राचीन लोकोत्सवाला वात्स्यायनॠषिंनी कौमुदीजागर व वामन पुराणाने दीपदानजागर म्हटले आहे. या पौर्णिमेला माणिकेथारी म्हणजे मोती तयार करणारी असेही संबोधिले जाते. पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या Sharad Purnima दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांमध्ये असतो.चंद्राची किरणे विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. इंद्र, लक्ष्मी, मायलोमा आणि खोलोमा या देवतांची पूजा या रात्री केली जाते. पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना समर्पित करुन व आप्तेष्टांना देऊन स्वत सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य On the Kojagiri Purnima offer milk to the Moon दाखवतात. या दिवशी बळीराजाची पूजा करावी व ज्येष्ठ आयत्याचे औक्षण करावे असे वामन पुराणात सांगितले आहे. अशी माहिती महंत पीठाधीश्वर अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांनी दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST