Third Gender Gathering : सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भरला तृतीयपंथींचा मेळावा - तृतीयपंथींचा मेळावा
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/28-10-2023/640-480-19882717-thumbnail-16x9-thirdgender.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Oct 28, 2023, 9:03 PM IST
नाशिक Third Gender Gathering : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या नाशिकच्या वणी सप्तश्रृंगी गडावर कोजागरी पौर्णिमेला तृतीयपंथींचा मेळावा भरला. (Saptshringi fort) या मेळाव्यासाठी गडावर राज्यभरातील तृतीयपंथी दाखल होतात. महाराष्ट्रासह इतर राज्यातून देखील तृतीयपंथींचा समावेश होता. सप्तशृंगी गडावरील शिवालय तलावालगत अर्धनारी नटेश्वरीचे मंदिर आहे. (Kojagiri Purnima) इथे असलेल्या मूर्तीचं अर्ध शरीर हे शिवाचं व अर्ध शरीर हे देवीचं आहे. (gathering of third gender at Saptshringi fort)
परराज्यातून तृतीयपंथी नाशकात : या ठिकाणी शेकडो तृतीयपंथींनी पूजाअर्चा करत सप्तशृंगी मातेचा जागर केला. मागील 30 वर्षांत तृतीयपंथीयांची सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमा उत्साह होत असतो. दिवसेंदिवस या उत्सवात भर पडत असून महाराष्ट्रचं नाही तर इतर राज्यातून देखील तृतीयपंथी या ठिकाणी येत असतात. तसंच या दिवशी 3 ते 4 लाख भाविक आई सप्तशृंगी मातेच्या चरणी लीन होत असतात.
वणी गावातून छबिना मिरवणूक : आज कोजागिरी पौर्णिमेच्या मुहुर्तावर राज्यभरातील तृतीयपंथीयांच्या प्रमुखांनी स्वतंत्रपणे आपल्या शिष्य गणांसह वणी सप्तशृंगी गडावरील शिवालय तलावावर स्नान करून सोबत आणलेल्या देवीच्या मूर्तींना शास्त्रोक्तपणे अभिषेक केला. त्यानंतर सायंकाळी वणी गावातून छबिना मिरवणुकीला सुरुवात झाली.