मराठा आरक्षणावरून ओबीसी नेत्यांना ट्रोल केलं जातंय - विजय वडेट्टीवार - Wadettiwar About Maratha Reservation

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2023, 7:25 PM IST

नांदेड Wadettiwar About Maratha Reservation : ओबीसी नेत्यांना ट्रोल केलं जातंय. मराठा आरक्षणाबद्दल मी माझी भूमिका मांडली आहे. मला ट्रोल करायचं काहीही कारण नाही. मी मराठा समाजाच्या विरोधात नाही. मराठा समाजाचं अहित करायचं नाही. त्यामध्ये तरुण मुलांचं नुकसान आम्हालाही करायचं नाही; पण ओबीसी समाजातील गरिबांच्या हक्काचं स्वरक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे. माझी भूमिका स्पष्ट आहे, असं मत विधानसभेचे विरोधीपक्ष नेता विजय वडेट्टीवार यांनी परभणी दौऱ्यादरम्यान व्यक्त केले. दोन धर्मात दरी निर्माण होईल अशी माझी भूमिका नाही. ती असूही शकत नाही. कारण, राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीनं हे परवडणारं नाही. सरकारला दिलेल्या मुदतीत जरांगे पाटलाचं म्हणणं मान्य करावं, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. (Maratha Reservation Issue)

सध्या इंडियाचाच माहोल: आज (रविवारी)  नांदेडच्या विमानतळावर आगमन होताच त्यांनी टीम इंडियाला शुभेच्छा देताना सांगितले की, (vijay wadettiwar wishes to india team) सध्या देशात राजकीयही इंडियाचा माहोल आहे आणि क्रिकेटमध्येही इंडियाचा माहोल आहे. (world cup 2023) ज्या पद्धतीनं आपली टीम सध्या फार्मात आहे. वल्ड रँकिंगमध्ये बॉलर, बॅट्समन आज इंडियाबरोबर आहेत. त्यामुळे वल्ड कप इंडियाच जिंकणार आहे, हा माझा विश्वास आहे. (vijay wadettiwar parbhani tour)

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.