Nitin Gadkari : सरकार हे विषकन्यासारखे, छाया पडल्यास प्रकल्प नष्ट होतो- नितीन गडकरी
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर: देशाच्या कृषी क्षेत्राचे उत्पन्न हे आपल्याला 22 टक्के पर्यंत न्यायचे आहे. हे ज्या दिवशी नेऊ त्या दिवशी शेतकऱ्यांची मजुरी ही 1 हजार 500 रुपये होईल. मी विरोधीपक्ष नेता होतो. तेव्हा आणि आजही या मतावर ठाम आहे की, गॉड आणि गव्हर्नमेंटवर आपला विश्वास असतो. पण सरकारचा हस्तक्षेप, सरकारचा सहभाग आणि सरकारची छाया देखील ज्या प्रकल्पावर पडते, तो प्रकल्प नष्ट होतो. म्हणून सरकार म्हणजे विषकन्यासारखे असते. यामुळे सरकारपासून जो दूर राहील तोच प्रगती करू शकतो, असे बेधडक व्यक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ते काल नागपूर येथे कृषी विकास प्रतिष्ठानतर्फे आयोजित सी.डी माई कृषी पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.
एकूण देशांतर्गत उत्पादनातील कृषी क्षेत्राचे योगदान 22 टक्क्यांवर नेणे हे सध्या देशासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. डॉ सी डी मायी कृषी पुरस्कार सोहळ्याला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, काही पिकांची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) बाजाराच्या दरापेक्षा जास्त आहे. यामुळे केंद्र सरकारला शेतमालाच्या खरेदीसाठी 1.50 लाख कोटी रुपये खर्च करावे लागले. शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. ग्रीन हायड्रोजन आणि इथेनॉलच्या उत्पादनातही शेतकऱ्यांनी योगदान दिले पाहिजे.